
वसमत : गोदावरी नदीतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास मंत्री राधाकृष्ण पाटील यांचा मंदाडे समितीवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात केला. मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी गोदावरी नदी समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडावे, अशी मागणी करीत मंदाडे समितीच्या अहवालाला स्थगिती देणार का, असा प्रश्न त्यांनी केला.