Travel Concession: पत्रकारांना सर्वच एसटी बसमध्ये मोफत प्रवास; प्रस्ताव शासनाकडे पाठवला, व्यवस्थापकीय संचालक कुसेकर यांची माहिती
Travel Benefit: अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आता सर्व एसटी बसमध्ये मोफत प्रवास मिळावा यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी याची माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळातील ई-बससह अन्य काही बसमध्ये ही सवलत नाकारली जाते.