
पैठण/जायकवाडी : जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून बुधवारी (ता. १६) खरीप हंगामासाठी संरक्षणात्मक पाणीपाळी सुरू झाली आहे. यात डाव्या कालव्यातून १०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे.