यंदा गणेश मंडळांत आणि पोलिस बंदोबस्तातही वाढ

यंदा गणेश मंडळांत आणि पोलिस बंदोबस्तातही वाढ
Published on
यंदा सार्वजनिक गणेश मंडळांत वाढ, गतवर्षी ८११, आता ९०० हून अधिक ------------------ सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १० ः यंदा शहर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवात गतवर्षीच्या तुलनेत ५५ ते ६० मंडळांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहर पोलिस दलाने बंदोबस्तातही वाढ केली आहे. सध्या गणेश मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणे सुरू आहे. ही परवानगी घेताना गणेश मंडळांची दैनंदिनीपासून मिरवणुकीच्या मार्गापर्यंतचा सर्व आराखडा असलेली ‘एसओपी’ देणे हा सर्वांत महत्त्वाचा दंडक पोलिसांकडून घालण्यात आला आहे. यंदाच्या नवीन आकडेवारीनुसार, ९०० ते ९५० सार्वजनिक गणेश मंडळे असणार आहेत. २०२५ मध्ये हा आकडा ८११ इतका होता. पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक अंतर्गत २०२५ मध्ये ४०५ परवानाधारक सार्वजनिक मंडळे होती. यंदा यात वाढ होऊन ४५० मंडळे झाली आहेत. यामध्ये ५५ ते ६० मंडळांची वाढ झाली आहे. परिमंडळ २ मध्ये ४०६ मंडळे होती, हीच मंडळे आता ५०० वर गेली आहेत. यामध्ये १४ सप्टेंबरपर्यंत वाढही होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. १ ऑगस्टपासून गणेश मंडळांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून, ५ सप्टेंबरअखेर १४२ ऑनलान अर्ज प्राप्त झाले होते. या मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत महापालिकेत सहायक पोलिस आयुक्त विभागातील प्रत्येकी १ अधिकारी, १ अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर विशेष शाखेतील १ अंमलदार समन्वयक असणार आहे. ---- घरगुती गणेशमूर्तींची संख्या वाढणार २०२५ मध्ये सार्वजनिक ८११ गणेशमूर्तींची स्थापना झाली होती तर १,६५०० घरगुती गणेशमूर्तींची स्थापना झाली होती. छावणी परिसरातील २६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा सार्वजनिक आणि घरगुती मंडळांचीही संख्या वाढणार असल्याने यासाठी पोलिस बंदोबस्तासाठीही कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील १५ दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्यांचाही प्रश्‍न उपस्थित झाला असून महत्त्वाच्या कारणांसाठीच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com