जिल्ह्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा

जिल्ह्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा
Published on: 
जिल्ह्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची वानवा ---- पालिकेचा तीन कोटींचा प्रस्ताव त्रुटींमुळे परत; १२ ठिकाणे निश्चित ----- धाराशिव, ता. ३१ (बातमीदार) ः जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा असलेला अभाव लक्षात घेता शहरात विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने काही स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वर्षभरापासून यासाठी सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून तो फेरसादर करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात विविध जिल्हा व तालुकास्तरीय कामकामाजांसाठी येणाऱ्या बाहेरगावच्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये महिलांची तर मोठी परवड होते. त्यामुळे शहरातील विविध भागांत एकूण १० ठिकाणी ऑटोमेटिव्ह स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय पालिकेने वर्षभरापूर्वी घेतला होता. त्यासाठीचा प्रस्तावही सरकारकडे पाठविला होता. मात्र, प्रदीर्घ प्रतीक्षेतनंतर हा प्रस्ताव काही त्रुटी असल्याचे कारण देत त्याची पूर्तता करून पुन्हा सादर करण्यास सांगितले होते. --- बारा ठिकाणी उभारणार ऑटोमेटिव्ह स्वच्छतागृहे पालिकेने आता एकूण १२ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन कोटींच्या जवळपास खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्तावही पालिकेने काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. परंतु, हा प्रस्तावही काही त्रुटी असल्याने नगर परिषद प्रशासनाने परत पाठविला आहे. आता या त्रुटींची पूर्तता करून फेरसादर केला जाणार आहे. त्यानुसार एकूण १२ ठिकाणी उभारण्यात येणारी स्वच्छतागृहे ही ऑटोमेटिव्ह अर्थात प्री-फॅब्रिकेटेड असतील. त्यामुळे त्यात गरजेइतकेच पाणी वापर करता येऊ शकतो. पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो, अशी ही स्वच्छतागृहे राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा न्यायालये आदी कार्यालये एकाच भागात आहेत. याठिकाणी येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना थेट बसस्थानकच गाठावे लागते. त्यामुळे वर्दळीच्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. ------ ((कोट)) शहरात एकूण बारा ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने प्रस्तावही तयार केला आहे. या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असून, त्याची पूर्तता लवकरच करून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. - अभिजित गोरे, उपमुख्याधिकारी, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.