रब्बीसाठी पीकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रब्बीसाठी पीकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Published on: 
रब्बीसाठी पीकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ------ ज्वारी, गहू, हरभरा, कांदा व भुईमुगाचा समावेश; पिकांनुसार अंतिम मुदत ---- जळकोट, ता. १२ (शहर बातमीदार) : रब्बी हंगाम २०२६ मध्ये नैसर्गिक आपत्ती व विविध प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिकांना विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय पाटील यांनी केले. ही योजना पात्र कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी तसेच कुळांसाठी ऐच्छिक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, ई-पीक पाहणीची नोंद असलेला अद्ययावत ७/१२, फार्मर आयडी, बँक पासबुक व अधिकृत फोटो ओळखपत्र आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून किंवा प्रत्यक्ष अर्ज करता येईल. बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पोस्ट कार्यालय, विमा प्रतिनिधी, सार्वजनिक सुविधा केंद्र किंवा अधिकृत संकेतस्थळावरून विहित मुदतीत विमा हप्ता भरता येणार आहे. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान व नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ------- अर्जाची अंतिम मुदत ज्वारी - ३० नोव्हेंबर २०२६ गहू, हरभरा, कांदा - १५ डिसेंबर २०२६ उन्हाळी भुईमूग - ३१ मार्च २०२७ आवश्यक कागदपत्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.