Beed News: अवकाळीच्या गर्जनेने चुकला काळजाचा ठोका; रब्बी पिकांना अवकाळी पावसाची धास्ती; गहू, ज्वारी, हरभरा काढणीला वेग

Impact of Untimely Rain on Rabi Crops: रब्बी पिके, अवकाळी पाऊस आणि काढणीची धास्ती; शेतकरी हार्वेस्टरचा वापर करून वेळेत कापणी करत आहेत, आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न.
Beed News

Beed News

esakal

Updated on

टाकरवण: कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते. यंदा निसर्गाने साथ दिली. पाणी मुबलक होते आणि डोलणारी रब्बीची पिके पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांत सुखस्वप्न तरळू लागले होते. मात्र, निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा आडवा आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून टाकरवण परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर ढगांची गर्दी दाटून येत आहे.

जणू काही अस्मानी संकट दारातच उभे असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळी पाऊस हिरावून तर नेणार नाही ना, या चिंतेने बळिराजाचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले आहेत.

परिसरात सध्या गहू, हरभरा आणि ज्वारीच्या काढणीचा हंगाम ऐन जोमात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com