Seeds Subsidy: रब्बी ज्वारी पेरणीसाठी शासनाची मदत; शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान

Rabi Sorghum Seeds Subsidy, 50% Seed Subsidy, MahaDBT Scheme: रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रमाणित ज्वारीच्या बियाण्यांवर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
Farmers can apply online for a 50% subsidy on certified Rabi sorghum seeds under the MahaDBT portal scheme for 2026–27.

Farmers can apply online for a 50% subsidy on certified Rabi sorghum seeds under the MahaDBT portal scheme for 2026–27.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : रब्बीसाठी ज्वारीचे प्रमाणित बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी तसेच शेतकरी गटांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली. वर्ष २०२६-२७ या वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण उपअभियान-पौष्टिक तृणधान्य (एनएफएसएनएम-एनसी) अंतर्गत रब्बी हंगामासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके या दोन घटकांचा समावेश असल्याचेही गवळी यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com