Bidkin News: आरोग्य विभागाचे पथक म्हारोळ्यात; घरोघरी सर्वेक्षण सुरू, ग्रामस्थांचे समुपदेशन, भीती केली दूर
Anti Rabies Vaccine: बिडकीन (ता. पैठण) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने वासराला चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. गायीच्या दुधातून रेबीज पसरण्याच्या भीतीने ५५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले.
बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) : म्हारोळा येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका वासराचा मृत्यू झाला. दरम्यान, या वासराने ज्या गायीचे दूध पिल्ले त्या गायीच्या दुधाचा गावात अनेक घरांमध्ये पुरवठा होत होता.