Railway Mega Block: रेल्वेचा बुधवारपासून १६ दिवसांचा मेगा ब्लॉक ;रेल्वेचा बुधवारपासून १६ दिवसांचा मेगा ब्लॉक

Railway Mega Block: नगरसूल-तारूर मार्गावरील दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि सिग्नलिंगच्या कामांसाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
A 16-day railway mega block on the Nagarsol-Tarur route will affect several passenger and express train services.

A 16-day railway mega block on the Nagarsol-Tarur route will affect several passenger and express train services.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि सिग्नलिंगच्या कामांमुळे रेल्वेची प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे नगरसूल-तारूर मार्गावर २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत १६ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे जालना-नगरसूल मार्गावरील ४ प्रवासी गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर १२ गाड्यांचा मार्ग कमी करत त्या अंशतः रद्द केल्या आहेत. याशिवाय, लांब पल्ल्याच्या ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या ७० ते ८० मिनिटे उशिराने धावतील. मेगा ब्लॉकची कामे २५ तारखेपासून सुरू होणार असली, तरी ३० नोव्हेंबरपासून रेल्वेसेवा विस्कळित होणार आहे.

Loading content, please wait...