
पुणे/खडकवासला : खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. सध्या ५.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला तो ५.७१ टीएमसी होता. जिल्ह्यातील खेड, बारामती, इंदापूर, जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. मंगळवारी (ता. २७) खडकवासला धरणक्षेत्रामध्ये २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.