Monsoon Challenges : पळसगाव-कौटगाव रस्त्याची हालत बिकट; शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होत आहे कसरत
Infrastructure Problems : पावसामुळे पळसगाव आणि कौटगाव रस्ता चिखलमय झाला असून शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डांबरीकरणाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केल्याने कामाची गती कमी आहे.
खुलताबाद : तालुक्यातील पळसगाव आणि कौटगाव रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून खचला आहे. रस्त्यावरून ये-जा करताना शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांची वाट बिकट झाली आहे.