---------
राजीव गांधी कृषी महाविद्यालयास विजेतेपद
----------
आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा; कृषी महाविद्यालय उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.१७ ः तालुक्यातील वरपुड येथे आयोजित मुलांच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद परभणी येथील राजीव गांधी कृषी महाविद्यालयाने तर उपविजेतेपद वनामकृवी अंतर्गत कृषी महाविद्यालयाने पटकावले.
वरपुड येथील अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण (कृषी) डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते झााले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित वरपुडकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तांत्रिक अधिकारी डॉ. जी. एम. कोटे, संचालक शिक्षण डॉ. एस. ए. चव्हाण, संस्थेचे सचिव सुशील वरपुडकर, क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सी. एस. डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन राधिका पाटील यांनी केले. या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे धीरज हिवरे, विलास देशमुख, नितीन चव्हाण, आदिनाथ दुधाटे, तबरेज खान, प्रा. पी.एम. कांबळे, प्रा. पूजा मोरे ,महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. प्रसेनजित बनसोडे, दया कनकुटे, संजय अवरगंड, दुबे आदींनी पुढाकार घेतला.