पंकजा मुंडे नाराज नाहीत; प्रवीण दरेकर

राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नियोजनामुळे यश
Rajya Sabha elections Pankaja Munde is not upset Praveen Darekar
Rajya Sabha elections Pankaja Munde is not upset Praveen Darekarsakal

औरंगाबाद : माजी मंत्री पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्या नाराज नाहीत. त्यांच्यासाठी विधान परिषद म्हणजे जीवन मरणाचा प्रश्‍न किंवा मोठी गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे एका कार्यक्रमासाठी जाताना शनिवारी त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलनेही केले. या अनुषंगाने दरेकर म्हणाले की, पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्या राज्याच्या प्रभारी आहेत.

त्यांना आमच्या पक्षात भविष्य उत्तुंग आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकाभिमुख आहे. काही लोक हा विषय तापवण्याचा प्रयत्न करत असून ते आगीत तेल ओतण्याचे कम करीत आहेत. मात्र यामुळे पंकजा मुंडे नाराज असण्याचे कारण नाही. औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर हल्ला करणारे कोण होते, हे माहीत नाही, या मागे कोण होते हे माहीत नसल्याचेही दरेकरांनी सागितले.

फडणवीस यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे यश

राज्यसभेतील सहाव्या जागेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मायक्रो प्लॅनिंग यशस्वी ठरले. जनतेने पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर विश्‍वास दाखवला. फडणवीस यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कौतुक केले आहे. पोपटपंची संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्‍ट्राची प्रतिमा खालावली आहे. या निवडणुकीत संजय राऊत यांच्यापेक्षा धनंजय महाडिक यांना जास्त मते मिळाली. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत अशीच रणनीती वापरणार आहोत. शिवसेना स्वाभिमानी असती तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्याकडे मतांसाठी लाचारी पत्करली नसती असा आरोपही दरेकरांनी केला. दरम्यान माजी मंत्री संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्याचा केविलवाणी प्रकार करीत असल्याचा आरोपही दरेकरांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com