
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या राज ठाकरे-उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. ते दोघे एकत्र येणार नाहीत, आणि आलेच तरी काहीही फरक पडणार नाही. जर एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल, असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.