रांजणी ग्रामपंचायत
रांजणी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी चेके यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कुदरत अली, सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच शेख रहीम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
...............
राजकुंवर महिला महाविद्यालय
धावडा ः येथील राजकुंवर महिला महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अरविंद तबडे यांनी प्रतिमेचे पूजन केले.यावेळी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वीटी मिसाळ हिने केले. अंजली बारोटे यांनी आभार मानले.
..................
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात
धावडा : विझोरा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य श्री शंकर पुंजाजी बावणे, प्रा.अविनाश गवळी, प्रा. गोपाल लाठे, गोपाल लेणेकर, जगनाथ आढाव, योगेश कानडजे उपस्थित होते.
......
दीपभारती विद्यालय, वडोद तांगडा
धावडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील दीपभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एस. टी. कर्वे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि त्यांच्या त्यागाचे महत्त्व मुख्याध्यापक कर्वे यांनी सांगितले. कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
.......
अंतरवाली टेंभी
अंतरवाली टेंभी ः येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद शाळा तसेच ओम शांती विद्यालय आदी ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग व संघर्षाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
................
उढाण कंडारी
अंतरवाली टेंभी ः उढाण कंडारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पूजा सोमनाथ मोताळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी उपसरपंच हेमा उढाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.दरम्यान, उढाण कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेत सोमनाथ मोताळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.