Paithan Museum : दुर्मिळ वस्तू, शस्त्रे पाहून भारावले पर्यटक; पैठण येथील शासकीय वस्तुसंग्रहालयात विविध कालखंडातील वस्तू
Cultural Heritage : पैठण येथील शासकीय संग्रहालयात दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्तलिखित पत्र पाहून पर्यटक भारावले. प्राचीन भारताच्या व्यापार, वेशभूषा व कलाकुसरीचे दर्शन येथे घडते.
जायकवाडी : पैठण येथील कै. बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयाला रविवारी (ता. १८) पर्यटकांनी भेट दिली. दुर्मिळ वस्तू, छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्तलिखित पत्र, विविध कालखंडातील वस्तू बघून पर्यटक भारावले होते.