Buddha Light Festival : वेरूळच्या दहाव्या लेणीतील तथागत बुद्ध यांच्या मुखावर पडलेल्या तेजोमय सूर्यकिरणांचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी अलोट गर्दी केली. हा दुर्मिळ प्रकाशोत्सव अर्धा तास अनुभवता आला.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील दहा क्रमांकाच्या लेणीतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या मुखावर सोमवारी अर्धा तास पडलेल्या किरणोत्सवाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली.