भोकरदन : मराठवाडा-खानदेश सीमेजवळ धावडा (ता. भोकरदन) भागात, अजिंठा डोंगरावर दुर्मिळ सरडा आढळला. ‘पेनिनसुला रॉक अगाम’ या प्रजातीतील हा सरडा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले..अजिंठा डोंगरात ढालकीच्या धबधब्याजवळील भोकरदन वनक्षेत्रातील पठारावर सिल्लोडचे पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील, तोंडापूर येथील वन्यजीव संरक्षक भूषण कानडजे सोमवारी (ता. २६) गेले होते. तेथे एका खडकावर त्यांना ‘पेनिनसुला रॉक अगाम’ या प्रजातीचा सरडा दिसला. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत आढळणाऱ्या या सरड्याचा महाराष्ट्रात अधिवास दुर्मिळ आहे. या प्रजातीस सूर्यप्रकाश अधिक आवडतो. त्यामुळे खडक, कडे-कपारीतील दगडांवर हा सरडा उभ्या अवस्थेत म्हणजे बराच वेळ स्थिर उभा असतो. त्याची ‘झेडएसआय’ व लोक जैवविविधता नोंदवहीत नोंद झाली आहे..खडकावर आढळलेला रंगवैविध्य असणारा ‘अगाम’ सरडा मिलनासक्त असून मादीस आकर्षित करण्यासाठी त्याचा रंग गडद लाल-भगवा व चमकदार बनतो. त्याच्या पाठीवर लाल भडक भगव्या रंगाचा चट्टा असतो. ओठ, तोंड लाल-भगवे असते. शेपटीकडील भाग, पोट, पाय गर्द काळ्या रंगाचे असते, जे खडकावर लपण्यासाठी निसर्ग देणे आहे. दरम्यान, भारताच्या तिन्ही बाजूंनी समुद्र तथा पाणी वेढलेले असल्याने या भूभागास ‘पेनिनसुला’ म्हटले जाते. खडकावर जास्त वेळ अधिवास व ‘अगोमिडा’ गणातील असल्यामुळे त्यास ‘अगाम’ संबोधले जाते, असे डॉ. पाटील व कानडजे यांनी सांगितले..जैवविविधता जपण्याची गरजअजिंठा डोंगर रांगांचा हा भाग जैवविविधतेने संपन्न आहे. धावडा परिसरात गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. वनक्षेत्र घटले आहे. त्यामुळे या भागात तापमानवाढीचे संकेत आहेत. परिणामी जैवविविधा जपण्यावर भर देण्याची गरज पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.उन्हाळ्यात अधिक तापमान असणाऱ्या, जास्त किटक, खडकाळ भाग असलेल्या भागात अधिवासास प्राधान्य देणारी सरड्याची ही प्रजाती आहे. ही प्रजाती फक्त कीटकभक्षी आहे. कृषी क्षेत्र, अनेक वनस्पतींवरील कीटक खात असल्याने ही प्रजाती नैसर्गिक कीड नियंत्रक आहे. हा सरडा मराठवाड्यात सापडणे काहीसे आनंददायी असले तरी एक प्रकारे येथील पर्यावरणास धोक्याची घंटा आहे.डॉ. संतोष पाटील, जैवविविधता संवर्धक, पर्यावरण अभ्यासक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.