सोनपेठ तालुक्यात ८७२ रेशनकार्ड अपात्र

सोनपेठ तालुक्यात ८७२ रेशनकार्ड अपात्र
Published on
सोनपेठ तालुक्यात ८७२ रेशनकार्ड अपात्र -------------- मिशन सुधार अभियानांतर्गत तपासणी; लाभार्थ्यांवर कारवाईची शक्यता सोनपेठ, ता.४ (बातमीदार) : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत तालुक्यातील रेशन कार्डांची व्यापक तपासणी सुरू आहे. या तपासणीत आतापर्यंत ८७२ शिधापत्रिकाधारक अपात्र असल्याची माहिती तहसीलदार सुनील कावरखे यांनी दिली. शहरासह ग्रामीण भागात एकूण ७५ रास्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना गहू, तांदूळ यासह विविध अन्नधान्याचे वितरण केले जाते. मात्र, सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी सुरू असलेल्या मिशन सुधार अभियानांतर्गत प्रशासनाने रेशनकार्डधारकांची तपासणी हाती घेतली आहे. तालुक्यातील पात्र प्राधान्य कुटुंब, अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे १६ हजार ८१७ शिधापत्रिकाधारकांपैकी ८७२ जण अपात्र आढळून आले. यात मृत व्यक्तींच्या नावावरील १५४ कार्डे, दुहेरी नाव नोंदणीची ११२ कार्डे, उच्च उत्पन्न गटातील ४४१ लाभार्थी, दीर्घकाळ धान्य न घेणारे ११५ आणि इतर त्रुटींची ५० कार्डे असल्याचे तपासणीत समोर आले आहे. ------------ निकष पूर्तता न करणाऱ्यांची छाननी रेशन कार्डधारकांच्या पात्रतेची तपासणी करताना एकापेक्षा अधिक रेशनकार्ड किंवा दुहेरी नाव नोंदणी, कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नातील विसंगती, रेशनकार्ड व ई-केवायसीमधील त्रुटी, चारचाकी वाहनाची मालकी, कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाची माहिती तसेच आयकर विवरणपत्र भरणे आदी बाबी तपासल्या जात आहेत. अशी माहिती तहसीलदार सुनील कावरखे व पुरवठा निरीक्षक अधिकारी संदीप जाधव यांनी दिली. --------- पात्रतेची व्यापक पडताळणी सुरू मिशन सुधार अभियानांतर्गत प्रशासनाकडून रेशनकार्डधारकांच्या पात्रतेची व्यापक पडताळणी सुरू असून, अपात्र आढळणाऱ्या लाभार्थ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय धान्य योजनांचा लाभ मिळावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com