

The Role of Reading in Shaping a Writer’s Mind
Sakal
- प्रा. जीवन मुळे
सरस्वतीचे दार हे ज्ञानप्राप्तीचे द्वार समजले जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’. थोडक्यात, देवाच्या दारात तुम्ही क्षणभर उभे राहून पाहा, मन प्रसन्नतेसह अनेक गोष्टी साध्य होतील. तद्वतच ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वतीच्या दारात अर्थातच पुस्तक महोत्सवाच्या दालनात तुम्ही क्षणभर वाचनानंद घेऊन पाहा, प्रत्यक्ष अनुभवा. हा अनुभव आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाला नवे परिमाण, अधिक चांगले परिणाम मिळवून देतो, हे मला स्वानुभवावरून ठामपणे सांगता येते. वाचन प्रक्रियेतूनच लेखनाचे अंकुर निर्माण होतात.