धुळे : टुडे पान २ साठी....सिंगल
--
देशपांडे वाचनालयात
वाचन प्रेरणा दिन
धुळे : सत्कार्योत्तेजक सभेचे श्रीमती जानकीबाई रघुनाथ देशपांडे मुक्तद्वार वाचनालयातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख वक्ते डॉ. ए. पी. जोशी यांनी व. पु. काळे, प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा दाखला देत वाचनामुळे भाषा शुद्ध होते, मनाची संवेदना वाढून नवीन दृष्टिकोन निर्माण होतो, असे सांगितले. तसेच बाबा आमटे यांच्या उदाहरणावरून माणसाची ओळख त्याच्या कामाने व्हावी, असे आवाहन केले. प्रा. विश्वास नकाणेकर यांनी, नशीब बदलायचे असेल तर सवयी बदला, हा डॉ. कलाम यांचा संदेश सांगत आवाहन केले. डॉ. एन. एम. जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन चिंगरे यांनी आभार मानले. चिटणीस प्रा. सतीश दीक्षित, कोषाध्यक्ष घनश्याम जोशी, वाचनालयाचे कार्याध्यक्ष डॉ. सचिन चिंगरे, स्पर्धा प्रमुख प्रा. राजश्री शेलकर, केंद्राचे संचालक डॉ. एन. एम. जोशी उपस्थित होते. ग्रंथपाल गौरव वाणी, सहायक ग्रंथपाल गोरख सूर्यवंशी, लिपिक प्रशांत वाघमारे, शिपाई विजय बागूल, भरत कचवे यांनी संयोजन केले.