रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, ४२ वर्षांची परंपरा

रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, ४२ वर्षांची परंपरा
Published on: 
ABD26J81080 ((((फोटो ओळ))) रेणुका मातेचा तांदळा. --- रेणुका माता मंदिरातील उत्सवाला ४२ वर्षांची परंपरा .... सिडको, ता. ११ ः जळगाव रोडवरील श्री रेणुका माता मंदिरात रविवारी (ता. ११) घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराने ४२ वर्षांची परंपरा जपत धार्मिक कार्यासोबतच सामाजिक सेवेचा वारसाही जपला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रोज दोन क्विंटल साबुदाणा खिचडीचा प्रसाद वितरीत केला जात आहे. मंदिरात पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. सनई-चौघड्यांच्या गजरात आरती, नैवेद्य आणि सायंकाळी महाआरती असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होत आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो. गेल्या १५ वर्षांपासून या सेवेत दररोज ३०० हून अधिक महिला सहभागी होत आहेत. मंदिरातील देवीच्या तांदळ्याची प्राणप्रतिष्ठा अण्णा महाराज यांनी केली होती. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार २०११ मध्ये सतीश वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मंदिराचा विस्तार करण्यात आला. मंदिराचा गाभारा सोन्याने सजविण्यात आला असून, तेथे तीन शक्तिपीठांची चित्रे तसेच परशुराम आणि अण्णा महाराज यांची चित्रे आहेत. --- सामाजिक उपक्रमांसाठी संकुलाची उभारणी मंदिराशेजारील सात हजार चौरस फूट जागा विश्वस्त मंडळाने खरेदी करून तेथे रेणुका माता सामाजिक संकुल उभारले आहे. या संकुलाच्या माध्यमातून अन्नछत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखभाल केंद्र, गरिबांसाठी दवाखाना, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, संस्कार वर्ग, अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करण्याचे नियोजन आहे. शिवाय शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरे, महाप्रसाद आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com