MPSC Exam : आरक्षणाच्या घोळात विद्यार्थ्यांचे सॅंडविच! राज्यसेवा मुख्य परीक्षा, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाची स्थिती
Reservation Confusion : राज्यसेवा परीक्षेतील एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील गोंधळामुळे अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणीत सापडले आहेत. आरक्षणातील या घोळामुळे विद्यार्थी मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या भरडले जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर : राज्यसेवा पूर्व परीक्षेत ‘एसईबीसी’च्या (सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग) विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’मध्ये (आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) जाण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रक्रिया केली.