रेशीम शेतीतून आर्थिक समृद्धी साधा

रेशीम शेतीतून आर्थिक समृद्धी साधा
Published on: 
रेशीम शेतीतून आर्थिक समृद्धी साधा --- जिल्हाधिकारी कर्डिले ः ४४ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ५ : रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत व पूरक उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे. अभ्यास दौऱ्यात मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरवून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आर्थिक समृद्धी साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आयोजित तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याला बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ४४ शेतकरी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी बीड येथील ग्लोबल विकास ट्रस्टला भेट देऊन आधुनिक रेशीम शेती तंत्रज्ञान, तुती लागवड व्यवस्थापन, अळी संगोपन आणि रेशीम कोष बाजारपेठेची माहिती घेतली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील रेशीम संशोधन केंद्रात सुधारित तुती जाती, रोगनियंत्रण आणि संगोपनगृह व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. तिसऱ्या दिवशी जालना येथील स्वयंचलित रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन प्रक्रिया उद्योग आणि उत्पन्नाच्या संधींची माहिती घेतली जाणार आहे. नव्या रेशीम उत्पादकांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, हा दौऱ्याचा उद्देश असल्याचे अशोक वडवळे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.