Digital Arrest : निवृत्त संचालकांना डिजिटल ॲरेस्ट! ड्रग पार्सल आल्याची धमकी; उकळले ३० लाख
Cyber Crime : सायबर भामट्यांनी निवृत्त उद्योग संचालकाला बनावट CBI अधिकाऱ्याच्या नावाखाली ३० लाखांची फसवणूक केली. ड्रग पार्सल प्रकरण सांगून त्यांना ‘डिजिटल अटक’ करण्याची धमकी देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : सायबर भामट्यांनी निवृत्त उद्योग संचालकांना सीबीआय अधिकारी असल्याचा धाक दाखवत डिजिटल ॲरेस्टचा डाव टाकला. त्यांच्याकडून ३० लाखांची एफडीची रक्कम उकळली.