वैजापूर ता.20(बातमीदार)गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महानुभाव पंथाच्या आठ मंदिरांना जोडणाऱ्या सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे २३४ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे धार्मिक स्थळांसह १७ गावांतील दळणवळणाला चालना मिळणार असून, पुरपरिस्थितीत शेतकरी व नागरिकांना बाहेर पडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.
सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बाजाठाण येथे सराला बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या अंतर्गत प्ररामा ०२ प्रजिमा २९ किलोमिटर २६/०० ते ७८/ ०० या १७ गांवाना जोडणार्यारस्त्याचे २३४ कोटी मंजुरीच्या सावखेडगंगा, वांजरगाव, भालगाव,डागपिंपळगाव,चांदेगाव,नागमठाण, अवलगाव, हमरापुर,बाजाठाण, शनिदेव गाव,चेंडूफळ,नेवरगाव, हैबतपुर,अगर कानडगाव, ममदापूर ,बगडी,जमगाव ते कायगाव या मार्गाचे काम प्रस्तावित आहे.तसेच बाजाठाण–कमलपूर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण आणि गोदावरी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सोहळ्यास महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे, हरिहर पांडे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर,माजी नगाराध्यक्ष साबेरखान, पंचगंगा कासाखरखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, हरिशरणगिरी महाराज, संदिपानजी महाराज, बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, योंगेद्रगिरी महाराज, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब जताप, रामहरी जाधव, महानुभाव पंथाचे चित्तरदास मुनी महाराज, अनिल बोंद्रे, अंकुश हिंगे,भाऊसाहेब झिंजुर्डे, पारस घाटे, डाॅ. प्रकाश शेळके, , भावराव भराडे, गणेश तांबे, मंगेश गायकवाड, विजय पवार, पवन चव्हाण, डाॅ. बाबासाहेब डांगे, प्रविण पवार, भावराव दुशिंग, संजय मिरगे,रामेश्वर पाटोळे, राजेश्वर हिवाळे, श्रीराम गायकवाड, संतोष गायकवाड, पांडुरंग मेघळे अनिल चव्हाण, सुभाष भराडे, बाळासाहेब गडगुळे, उपविभागिय अधिकारी अरुण जर्हाड, तहसिलदार सुनिल सावंत, बीडीओ जायभाय, ज्ञानेश्वर टेके, उप अभियंता रोडगे, विविध संत-महंत, लोकप्रतिनिधी व मान्यवरांचीही उपस्थिती होती.