
छत्रपती संभाजीनगर : घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याविरोधात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आघाडी उघडलेली असतानाच त्यांच्याच पक्षाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ‘टेन्शन, दडपणाखाली राहू नका, तुमची बदली होणार नाही, असे डॉ. सुक्रे यांना थेट आश्वस्त केले. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेत शिरसाट विरुद्ध जैस्वाल असे शीतयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.