
छत्रपती संभाजीनगर : विदेशी कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतातील खाद्यतेल बाजारावर आंतरराष्ट्रीय दरवाढ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर धोरणाचा परिणाम जाणवत आहे. दिवाळीत वाढलेले तेलाचे दर अद्याप कमी झालेले नाहीत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे.