
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरासह ग्रामीण भागातील महिलांना आपल्या संसाराचा गाडा चालवताना अनेक अर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाढती महागाई यामुळे अर्थिक चणचण भासत आहे. शेतात मोलमजुरीची कामं करत पोटाची खळगी भरावी लागत आहे. त्यातच प्रत्येक महिण्याला स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य, गोर- गरीब कुटुंबातील माणसांना परवडणारे नाही.