गेवराई शहरात डे-नाईट टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, १ लाखाचे बक्षीस, डान्सिंग अम्पायर सोन्या दिसणार मैदानावर

गेवराई शहरात डे-नाईट टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, १ लाखाचे बक्षीस, डान्सिंग अम्पायर सोन्या दिसणार मैदानावर
Published on: 
गेवराईत आर. के. चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार प्रथम विजेत्यास १ लाखाचे बक्षीस; सलग २० दिवस चालणार स्पर्धा गेवराई, ता. २६ (बातमीदार) : राहुल जिजा खंडागळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आर. के. चषक डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी (ता. २५) अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. येथील दसरा मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १ लाख २ हजार २२२ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार १११ रुपयांचे भरघोस बक्षीस ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यंदा संपूर्ण मराठवाड्यातून २० क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सलग वीस दिवस चालणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध डान्सिंग अम्पायर सोन्या बापू हे मैदानावर पंच म्हणून दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ही भव्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक मुन्ना मोटे, अमोल पवार, राम खंडागळे, रणजित डरफे, सोनू मुळे, मंगेश उदावंत, संदीप मुळे, फैसल चाऊस, अशोक गायकवाड, माऊली वाटमोडे, विष्णू खंडागळे, विजय खंडागळे, भागवत पिसाळ आणि अजय राऊत यांच्यासह आर. के. ग्रुपचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com