
वाळूज : तोंड बांधून आलेल्या चार दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह सव्वालाख रुपयांचा ऐवज लुटला. त्यात तीन तोळे आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. ही घटना वाळूजलगत टेंभापुरीच्या (ता. गंगापूर) अंतापूर शिवारातील शेतवस्तीवर रविवारी (ता. १२) मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.