Sambhaji Nagar Crime : जिल्हाभरात चोरट्यांची धूम ; वरखेडीत दिवसा दोन घरे फोडली

छत्रपती संभाजीनगर जळगाव रस्त्यावर असलेल्या वरखेडी (ता.सिल्लोड) येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.८) सकाळी भरदिवसा १० वाजता घडली.
Gharphodi
Gharphodisakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सद्या चाेरट्यांची धूम सुरू असून रात्रीसह दिवसाही चाेरीच्या घटना घडत आहेत. सिल्लाेड तालुक्यात चाेरट्यांनी भरदिवसा दाेन घरे फाेडून एेवज लंपास केला. तर देवगाव रंगारी येथे एका वृद्धेचे घर फाेडून लाखाेंचा एेवज लंपास केला. तसेच जिल्ह्यातही इतर ठिकाणीही राेज चाेरीच्या घटना घडत आहेत.

माणिकनगर, छत्रपती संभाजीनगर जळगाव रस्त्यावर असलेल्या वरखेडी (ता.सिल्लोड) येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.८) सकाळी भरदिवसा १० वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर असलेल्या वरखेडी येथील शेतात भागीनाथ फलके व गजानन फलके हे शेतकरी कुटुंबासह वास्तव्यास आहे.

त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी भागीनाथ फलके यांच्या घराचे कडी कुलूप तोडून १० हजार रुपये रोख तर गजानन फलके यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी भागीनाथ फलके,गजानन फलके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वडोदबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.फकीरचंद जारवाल, पो.ना.धनराज खाकरे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com