

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण भागातील इंधनपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे गॅस सिलिंडर कंपन्यांनी बुकिंग कालावधी वाढवला. त्यातही सिलिंडर बुक झाल्यानंंतर ७ ते १० दिवसांनंतर डिलिव्हर होत आहे. त्यामुळे एकच सिलिंडर असणारांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आता पेट्रोलपंपांवर रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पण, बाजारपेठेत स्टोच उपलब्ध नाही तर रॉकेल कसे उपयोगात आणायचे, असा प्रश्न गावागावांतील गृहिणींसमोर आहे.