RTE Admission : पहिल्या टप्प्यात ४ हजार जागांसाठी SMS

पालकांनी आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांकांची स्थिती तपासून पहावी.
RTE Admission
RTE Admissionsakal

छत्रपती संभाजीनगर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार २५ टक्के प्रवेशासाठी बुधवारी (ता.१२) पहिल्या टप्प्यात ४ हजार ३५ जागांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी काही पालकांना चार वाजल्यानंतर एसएमएस पाठवण्यात आले. उर्वरित पालकांना गुरुवारी (ता.१३) एसएमएस पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले.

यंदा जिल्ह्यातील ५४७ शाळांमधील ४ हजार ७३ जागांसाठी २० हजार ७८१ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या पाचपटीपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरीत प्रवेशासाठी निवड झाली अथवा नाही, याची माहिती घ्यावी, असे आवाहन आरटीई कक्षाकडून करण्यात आले आहे.

पालकांसाठी सूचना...

  • प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर संबंधित पालकांना एसएमएस पाठविणार.

  • पालकांनी आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांकांची स्थिती तपासून पहावी.

  • प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झाल्यावर अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी

  • अॅलॉटमेंट लेटरवर पडताळणी समितीचा पत्ता असेल तेथे जाऊन आवश्यक कागदपत्रांची पू्र्तता व पडताळणी करून घ्यावी

  • त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून करून घ्यावी.

वेबसाइट हॅंग

बुधवारी दुपारी चारनंतर शिक्षण विभागाकडून एसएमएस पाठविण्यात आले. मात्र, प्रवेशाची खात्री करण्यासाठी संकेतस्थळ हॅंग होत असल्याने पालकांना प्रवेशाची खात्री करता आली नाही. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळाला अडचणी येत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com