Cattle Transportation : गोवंशाची वाहतूक करणारी चार वाहने पकडली
Police Action : उदगीर शहरालगत मलकापूर पाटीजवळ ग्रामीण पोलिसांनी गोवंशाची क्रूरपणे वाहतूक करणारी चार वाहने पकडली. वाहनांसह पंधरा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उदगीर : शहरालगत असलेल्या मलकापूर पाटीजवळ ग्रामीण पोलिसांनी गोवंशाची निर्दयी व क्रूरपणे वाहनात डांबून वाहतूक करताना चार वाहने पकडली. वाहनांसह एकूण पंधरा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.