ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना २४ तास वीजपुरवठा करा आमदार कैलास पाटील यांची महावितरणकडे मागणी

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना  २४ तास वीजपुरवठा करा आमदार कैलास पाटील यांची महावितरणकडे मागणी
Published on: 
‘ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना चोवीस तास वीजपुरवठा करा’ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ ः यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विहिरी आणि जलस्त्रोतांना ‘गावठाण फिडर’वरून २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक जलस्त्रोतांमधील पाणीसाठा आधीच चिंताजनक पातळीवर खाली गेला आहे. त्यातच, ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत चालवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना स्वतंत्र डीटीसी उपलब्ध नाही. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा कृषी फिडरवरून होत असल्याने विजेच्या लहरीपणामुळे आणि वारंवार होणाऱ्या खंडांमुळे पाणीपुरवठा योजना कोलमडत आहेत. वेळेवर वीज उपलब्ध न झाल्याने विहिरींमध्ये पाणी असूनही नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवणे ग्रामपंचायतींना कठीण जात आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. कृषी फिडरऐवजी या जलस्त्रोतांची जोडणी गावठाण फिडरवरून केल्यास पाणीपुरवठा योजनांना सलग २४ तास वीज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणी उपसा करणे आणि गावांमध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे आमदार पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com