Sakal News Impact: दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार लेखनिक; परीक्षेपासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

writer for exam to disable
writer for exam to disable

औरंगाबाद: दरवर्षी अकरावीचे विद्यार्थी दिव्यांग मुलांना लेखनिक म्हणून मदत करतात. परंतु, कोरोनामुळे अकरावी प्रवेशाचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी? लेखनिक कुठून आणावे, असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची शिक्षण मंडळाने दखल घेत दिव्यांग मुलांना लेखनिक उपलब्ध करून देण्याचे आदेश शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारावीची परीक्षा २३ एप्रिल; तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अभ्यास सुरू आहे. मात्र, परीक्षेसाठी यंदा लेखनिक मिळेल का? लेखनिक मिळाला नाही तर पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाईल. व्यक्तिगत पातळीवर लेखनिक शोधावा, असे विद्यार्थ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून सांगण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. त्यामुळे मंडळाकडून सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच आपल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, यांची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे साडेपंधरा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मागील इयत्तेचा विद्यार्थी अथवा प्रौढ लेखनिक म्हणून देण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना आहेत. मुख्याध्यापक, प्राचार्यांनी लेखनिक देण्याबाबत मंडळाकडे शिफारस करावी. त्यानंतर विभागीय मंडळाकडून मान्यतेबाबतचा अहवाल १५ दिवसांच्या आत संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाला लेखी स्वरूपात कळवण्यात येईल. 

लेखनिक, वाचक बॅंक- 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत इच्छुक लेखनिक, वाचकांची बॅंक तयार करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी परिसरातील, शाळेतील विद्यार्थी, प्रौढ नागरिकांना समाजोपयोगी कामासाठी प्रेरित करण्याच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची माहिती http://www.research.net/r/readerwriterbank या लिंकवर ३१ मार्चपर्यंत भरून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.. 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणदान 
- परीक्षेत विद्यार्थ्याने आकृत्या, नकाशे व आलेख तक्ते काढण्याचा प्रयत्न केला असल्यास पूर्ण गुण दिले जाणार आहे. गणित विषयातील परिगणनेमध्ये संख्येच्या उलटसुलट लिहिणे (उदा ः १२ ऐवजी २१, ३१ ऐवजी १३) चिन्हांची अदलाबदल याकडे दुर्लक्ष करावे. गतिमंद, दुर्धर आजार, एचआयव्ही, दिव्यांग अशा आजाराने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांसाठी वाक्यरचना, वर्णलेख अशा चुकांकडे दुर्लक्ष करून उत्तरामधील गाभा लक्षात घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. 

अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या फॉन्टमधील प्रश्नपत्रिका- 
अंशतः अंध किंवा डोळ्यांचा त्रास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील प्रश्‍नपत्रिका मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्वरूपातील विद्यार्थी शाळा किंवा विद्यालयात असतील तर मुख्याध्यापक, प्राचार्यांनी अगोदरच कळवावे, अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत. 

विभागातील दहावी, बारावीचे दिव्यांग विद्यार्थी-

अ.क्र. जिल्हा दहावी बारावी 
1 औरंगाबाद २८३ २५७
2 बीड १८१ ११९
3 परभणी १४९ ९४
4 जालना ८८ १००
5 हिंगोली ८३ ५३
  एकूण ७८४ ६२३

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com