Maharashtra Education: ‘शालार्थ’ प्रणालीत माहिती अपलोड करा; अन्यथा गुन्हा
Shalarth Portal: खासगी अनुदानित व स्थानिक संस्थांच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता फक्त ‘शालार्थ’ प्रणालीद्वारेच दिले जाणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई होणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता केवळ ‘शालार्थ’ प्रणालीद्वारेच अदा केले जाणार आहे.