Sambhaji nagar : चौकशीनंतर परतल्या उपायुक्त अपर्णा थेटे Sambhaji Nagar Deputy Commissioner Aparna Thete returned after inquiry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

Sambhaji nagar : चौकशीनंतर परतल्या उपायुक्त अपर्णा थेटे

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढलेल्या निविदा घोटाळ्यात महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची शुक्रवारी (ता. २४) सलग पाचव्या दिवसी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या शहरात परतल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थींचे सर्वेक्षण केलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींना ईडीने समन्स बजावले आहेत, काही प्रतिनिधी शुक्रवारी ईडी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. इडीच्या पथकाने गेल्या आठवड्यात शहरात येऊन विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर पथकाने उपायुक्त तथा पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख अपर्णा थेटे यांना चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले.

त्यानुसार अपर्णा थेटे या सोमवारी मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस त्यांची ईडीने चौकशी केली. पाच दिवसांनंतर शुक्रवारी त्या शहरात परतल्या. दरम्यान महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनीही नगर रचना विभागांसह, आवास योजना विभागातील संबंधित काही फायली शुक्रवारी दुपारी मागवल्या, असे सूत्रांनी सांगितले.