Sambhaji nagar : विद्युततारेला अडकून शेतकऱ्याचा मृत्यू Sambhaji nagar Farmer dies electric stuck | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A young died due to electricity shock

Sambhaji nagar : विद्युततारेला अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

लोहगाव : रात्री पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मावसगव्हान (ता.पैठण) येथील तरूण शेतकऱ्यांचा तुटलेल्या विद्युत तारेत अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोहगाव शिवारात बुधवारी रात्री (ता.८) घडली. ही घटना गुरूवारी (ता.९) सकाळी उघडकीस आली.

गणेश कडुबाळ जाधव (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, मावसगव्हान येथील धरणग्रस्त तरून शेतकरी गणेश जाधव हा लोहगाव शिवारातील आपल्या शेतात रात्री पिकाला पाणी भरण्यासाठी दुचाकीवरून शेतात जात होता.

मात्र, ब्रम्हगव्हाण ते धरण शेती फिडरच्या खांबावरील एक तार तुटून खाली पडली होती. ही तार रात्रीच्या अंधारात न दिसल्याने त्यात अडकल्याने विजेच्या धक्का लागून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

सदर तरून शेतकरी गुरुवारी (ता.९) सकाळी मृतावस्थेत दिसून आला. माहिती मिळताच कुटुंबीय गावातील नागरिक, पोलिस पाटील माणिक साळवे यांना माहिती बिडकीन पोलिस ठाण्याला कळविले.

यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवशेसह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता वैद्यकीय अधिकारी आशिष वेदपाठक यांनी शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एमएलसी वरून बिडकीन ठाण्यात अकस्मात मृत्यू गुन्हा नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोमनाथ तांगडे करीत आहे.