Sambhaji Nagar : श्री रेणुकादेवी कारखाना निवडणुकीत भुमरे गटाचे १४ जण बिनविरोध

कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक मतदारसंघात एकूण पाच गट आहे
Sandipan Bhumre
Sandipan Bhumre sakal

विहामांडवा : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली असून पालकमंत्री संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असून महाविकास आघाडीचे बऱ्याच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने एकूण २१ संचालकांत मंत्री भुमरे गटाचे १४ जण बिनविरोध निवडून आले आहे.

सन २००० साली कारखान्याचे संस्थापक माजी आमदार चंद्रकांत घोडके यांनी शरद सहकारी साखर कारखाना या नावाने स्थापना केली. त्यानंतर तब्बल १७ वर्ष हा कारखाना घोडके यांच्या ताब्यात होता. कारखाना बंद असल्याने परिसरातील वाढत्या उसाचे क्षेत्र लक्षात घेता २०१७ च्या निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांना स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढून कारखाना ताब्यात घेतला.

त्यानंतर पुढील पाच वर्षे यशस्वीरीत्या कारखाना चालवला व त्याचे श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना असे नामांतरही केले. कारखाना सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला. महिन्याभरापूर्वी झालेल्या मार्केट कमिटी निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठ्या मतांनी पराभव झाल्याने तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मातब्बर नेते या निवडणुकीत अधिक मेहनत घेत आहे.

कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक मतदारसंघात एकूण पाच गट आहे. यामध्ये नितीन तांबे, ब्रम्हदेव नरके, भिमराव वाकडे हे टाकळी अंबड गटातून तर विहामांडवा गटात अक्षय डुकरे, दिलीप बोडखे, अफसर शेख यांची चौंढाळा गटातून अमोल थोर, नंदू पठाडे, सुभाष गोजरे, यांची तर कडेठाण गटातून विलास भुमरे, सुभाष चावरे, भरत तवार यांची बिनविरोध निवड झाली. सहकारी संस्था मतदार संघात राजू भुमरे तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कल्याण धायकर यांची निवड झाली. यामध्ये नवगाव एकमेव गट आहे.

की त्यामध्ये अर्ज बाद झालेला नाही. त्यामुळे नवगाव गटात मंत्री भुमरे यांच्या पॅनेलकडून चंद्रकांत गवांदे, लक्ष्मण डांगे व विष्णू नवथर तर महाविकास आघाडीकडून सुरेश दुबाले सुरेश चौधरी बबन गवांदे हे उमेदवार आहेत.

Sandipan Bhumre
Sambhaji Nagar : 'लालपरी'त महिला क्रांती, एसटीच्या इतिहासात प्रथमच महिलेने सिल्लोड मार्गावर चालवली बस

महिला मतदार संघात पुष्पाबाई लांडगे, भागीरथी गाभूड यांच्या विरुद्ध सुभद्राबाई डुकरे, शेख रुबाबी यांच्यात लढत होईल. इतर मागासवर्गीय मतदार संघात द्वारकाबाई काकडे व नवनाथ हाकम हे उमेदवार आहेत. भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघात ज्ञानदेव बढे व एकनाथ बेळगे हे उमेदवार आहेत.

Sandipan Bhumre
Sambhaji Nagar : बजाजनगर परिसरात कुंटणखान्यावर छापा

जुन्या नव्यांचा मेळ

रेणुका देवी कारखान्यामध्ये यावर्षी जुन्या संचालकासह नवीन लोकांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली होती. यामध्ये ८ नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

महाविकास आघाडीची अपील फेटाळली.

छाननीमधील बाद झालेल्या अर्जाची उमेदवार प्रादेशिक सह संचालक (साखर)औरंगाबाद यांच्याकडे व त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात ही याचिका दाखल केली होती. परंतु तिथेही याचिका फेटाळण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com