Sambhaji nagar : अखेर कोळवाडी परीक्षा केंद्र रद्द ; कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची कारवाई

आता शिवाजी महाविद्यालयात परीक्षा
महाविद्यालयात
महाविद्यालयात sakal

कन्नड : तालुक्यातील कोळवाडी येथील पदवी परीक्षेचे केंद्र परस्पर बदलल्याबाबत दैनिक सकाळने वृत्त प्रकाशित करताच कोळवाडीच्या गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. दै.सकाळच्या वृत्ताची व या घटनेची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून आता ही परीक्षा कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक प्रा.भारती गवळी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम व बी.एस्सी यासह पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत शुक्रवारी (ता.३१) कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलल्याचा प्रकार घडला होता. भरारी पथकाच्या निदर्शनास सदर बाब आल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात अहवाल परीक्षा विभागाला सादर केला.

याबाबत दैनिक सकाळने वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती. याची दखल घेऊन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे.आता सोमवारपासून (ता.३) या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कन्नड येथे होणार आहेत.

महाविद्यालयात
Sambhaji nagar : राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय छत्रपती संभाजीनगर

कोळवाडी येथून कन्नड येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था संबंधित महाविद्यालयाने करावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.गवळी यांनी दिली. या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या निर्णयाची संबंधित विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, पालक यांनी नोंद घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे.

महाविद्यालयात
Sambhaji nagar : तरुणीच्या डोक्यात बिअरच्या बॉटलने वार

चौकशी समिती स्थापन

औराळा येथील गोविंदराव पाटील जिवरख पाटील वरिष्ठ महाविद्यालयाने परस्पर परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी औराळा येथे नेऊन परीक्षा घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती समिती स्थापन केली. ही समिती सोमवारी (ता.३) संबंधित महाविद्यालयाला भेट देणार असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com