Sambhaji nagar : मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती

मराठवाडा एक्सप्रेसने जालना रेल्वेस्थानक सोडल्यानंतर एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू
प्रसूती
प्रसूती sakal

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये रविवारी (ता.१९) एका महिलेची प्रसूती झाली. यावेळी रेल्वेत असलेल्या महिला डॉक्टरांनी तत्परता दाखविली आणि महिला प्रवासी मदतीला धावून आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा एक्सप्रेसने जालना रेल्वेस्थानक सोडल्यानंतर एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हा रेल्वेत कोणी डॉक्टर आहे का, याची शोधाशोध करण्यात आली. तेव्हा नांदेड येथील डॉ. अश्विनी इंगळे या रेल्वेत होत्या. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

प्रसूती
Sambhaji nagar : पाणीपट्टी वसुलीच्या नावाने बोंबाबोंब

डॉ. इंगळे आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने त्यांनी सदर महिलेची प्रसूती केली. सध्या बाळ आणि आई सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर रेल्वेची यंत्रणा मदतीसाठी सज्ज झाली होती.

परंतु त्यापूर्वीच रेल्वेत डॉक्टर आणि महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली. मात्र मुकूंदवाडी येथून महिलेला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वेतील टीसी राकेशकुमार मीना, अभिषेककुमार यांनी महिलेला मदत मिळवून देण्यात पुढाकार घेतला.

प्रसूती
Sambhaji nagar : ‘औरंगाबाद’ नावाच्या फलकांवर फेकले दगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com