Sambhaji nagar : अन् पैसे मृताच्या खात्यावर जमा झाले; चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला

शेतकऱ्यांच्या पैशासाठी वर्षभरापासून कार्यालयाच्या चकरा
 बँकेकडून पैसे
बँकेकडून पैसेsakal

पाचोड : वृक्षलागवडीच्या कुशल बिलासाठी शेतकरी वर्षभरापासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत असला तरी त्याचे बिल चक्क वर्षभरापूर्वी संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाच वर्षापूर्वी निधन झालेल्या एका मृताच्या खात्यावर जमा झाले असल्याचा अनागोंदी कारभार उजेडात आला असून सदर रक्कम मुळ लाभार्थ्याला देण्यासंबंधी बँकेला संबंधित विभागाने पत्र दिले. त्यातही चुकांनी कळस गाठला आहे.

यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड खुर्द (ता.पैठण) येथील शेतकरी राधाकिसन उमाजी वाघ यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षापूर्वी आपल्या शेतात सामाजिक वनीकरण विभागाच्या यंत्रणेद्वारे महोगुणीची लागवड केली. सदरील अकुशल देयके मजुरांच्या नावे प्राप्त झाले. परंतु कुशल देय रक्कम १३ हजार ६०० रुपये वर्ष उलटले तरी मिळाले नाही. त्यामुळे राधाकिसन वाघ हे वर्षभरापासून कुशल बिलासाठी सामाजिक वनीकरण, तहसील व बँकेचे उंबरठे झिजवत आहे.

बँकेकडून पैसे न आल्याचे तर सामाजिक वनीकरण व तहसीलकडून बिल जमा केल्याचे सांगण्यात आले. वैतागलेल्या शेतकऱ्यांने पैसे पाठविल्याचा तपशील संबंधितांकडून उपलब्ध करून पाचोड (बु) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चौकशी केली असता सदर रक्कम १७ जुलै २२ रोजी पाचोड येथील पाच वर्षापूर्वी निधन झालेले विश्वंभर दत्तात्रेय भुमरे यांच्या खाते (क्रमांक-००४८११००२००२१३१) वर वर्ग झाल्याचे दिसून आले.

संबंधित लाभार्थ्याने मयताचे वारस धनराज भुमरे, युवराज भुमरे व रविराज भुमरे यांच्याकडे जाऊन आपले पैसे तुमच्या वडीलांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगितले असता त्यांनी खातरजमा करून पैसे देण्याचे मान्य केले. परंतु यासाठी वारस प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आदी किचकट अटीची पुर्तता करताना होणाऱ्या दमछाकीमुळे काणाडोळा केला.

अखेर लाभार्थी राधाकिसन वाघ यांनी पैठणच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे जाऊन मार्ग काढण्याची विनंती केली असता या विभागाने शाखा व्यवस्थापकास लेखी पत्र दिले. २९/०६/२०२२१ असे चुकीचे वर्ष नमूद केले. मात्र, यांत सदर रक्कम १३ हजार ६०० श्री. वाघ यांना देण्याचे कळविले. त्या पत्रात म्हटले आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३१ मे २२ रोजीचे धनादेश क्र.२५६३८४ खात्यावर जमा करण्यासाठी दिला.

धनादेशाची रक्कम १७/०६/२२ रोजी जमा केली. मात्र, धनादेशासोबत लाभार्थ्यांची त्यावेळी खाते क्रमांक टाइप करताना चुकून शेवटी दोन ऐवजी एक असा अंक चुकल्याने ही रक्कम सदरील चुकीच्या खात्यावर जमा झाली. करिता ही रक्कम राधाकिसन वाघ यांना देण्याचे सुचविले.

चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला

१३ हजार ६०० रुपयांसाठी वर्षभरापासून चकरा मारता मारता मिळणाऱ्या रकमेएवढे लाभार्थ्याचे पैसे खर्च झाले. एवढेच नव्हे सदर मृत लाभार्थ्यांच्या वारसांना एकत्र आणून त्यांची संमती, कागदपत्रे सादर करताना होणारी दमछाक पाहून "चारा आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला" या म्हणीचा प्रत्यय येतो असे राधाकिसन वाघ यांनी सांगितले.

 बँकेकडून पैसे
Sambhaji nagar : शाळा, महाविद्यालयांच्या गेटजवळच टपरी चहाची... अन् विक्री मात्र तंबाखूजन्य पदार्थांची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com