Sambhaji nagar : चक्क अतिक्रमित जागाच दिली रोज एक हजार रुपये भाड्याने!

सिडकोतील प्रकार; अनधिकृत रसवंत्यांवर महापालिकेची कारवाई
अतिक्रमण
अतिक्रमण sakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शुक्रवारी (ता.३१) सिडको-हडको भागात एकूण २० अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यात अनधिकृत रसवंत्या हटविण्यात आल्या. विशेष म्हणजे, एकाने तर चक्क अतिक्रमित जागा भाड्याने देऊन दररोज एक हजार रुपये भाडे वसुली सुरू केली होती!

सिडको एन-५ येथील सचिन नागूल यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून रसवंतीसाठी जागा भाड्याने दिली होती. या जागेसाठी दिवसाला एक हजार रुपये भाडे व एक लाख रुपये अनामत घेण्यात आली. तसा करार करण्यात आला होता. सचिन नागूल यांचा प्लॉट क्रमांक ८७ सिडकोचा असून, त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला सिडको व महापालिकेच्या जागेवर ताबा मिळवत, १२ बाय ३० आकाराच्या जागेवर सदर रसवंती भाड्याने दिली होती.

अतिक्रमण
Sambhaji nagar : उपायुक्तांसह २० अधिकारी-कर्मचारी जखमी

त्यासाठी व्यावसायिक वीजमीटर घेण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच आज कारवाई करण्यात आली. याच शेजारी श्री. पुजारी यांनी सामासिक अंतरात व पार्किंगच्या जागेत अशाच प्रकारे रसवंती भाड्याने दिली होती. एक टपरी टाकली होती,

हे अतिक्रमण काढण्यात आले. या रस्त्यावर चिश्‍तिया पोलिस चौकीपर्यंत सामासिक अंतरासमोर काही नागरिकांनी पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या थाटून अतिक्रमण केले होते. त्यामुळे पार्किंग प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरील दोन शेड निष्कासित करण्यात आले. एन-१२ परिसरातील स्वामी विवेकानंद नगर भागातील ऑड शेपच्या जागेत थाटलेले ब्युटी पार्लर हटविण्यात आले.

अतिक्रमण
Sambhaji nagar : पाणीपुरवठा योजनेचे काम फसवणुकीकडे चालले का?

याच भागातील दोन रसवंतीचे शेड व एक टपरी जप्त करण्यात आली. सायंकाळी सिडको कॅनॉट परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या चारचाकी हातगाड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, रामेश्वर सुरासे, सिडकोचे मिलन खिल्लारे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com