Sambhaji Nagar NCP : पदाधिकाऱ्यांच मन तळ्यात की मळ्यात

पैठण शहरासह तालुक्‍यातील चित्र; दोन आठवडे उलटूनही भूमिका अस्पष्ट
Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal

पैठण - येथील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. स्थानिक कार्यकर्ते आता कोणत्या गटाकडे जावे, कोणाकडे जाऊ नये याबाबत दोन आठवडा उलटूनही निश्चित भूमिका घेऊ शकलेले नाही.

Sharad pawar vs Ajit pawar
Mumbai Rain Accident : घराचे प्लास्टर कोसळून मुंबईत ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

पदाधिकाऱ्यांचे तळ्यात की मळ्यात, असे चालले असल्याने पैठण मतदार संघात सामान्य कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाले तेव्हा येथील शिवसेनेत फूट पडली. त्यावेळीही तालुक्यात अशीच परिस्थिती होती. आता शरद पवार यांच्या गटात जावे कि अजित पवार असा प्रश्न येथील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Paithan : प्रशासनाचा भोंगळ कारभार ; पैठण पंचायत समितीत तब्बल मागील १३ वर्षांपासून एकही आमसभा झाली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच पैठण विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेला टक्कर दिली आहे. त्यात एकदा शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांनी पराभूत करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा विधानसभेवर फडकावला होता.

तर मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनीही आघाडीचे मताधिक्य घेतले होते. आता स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्ष शिवसेनेशी कशाप्रकारे जुळवून घेतात, यावर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद ठरणार आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Paithan News : अतिवृष्टीची नोंद नसली तरी मदत - संदीपान भुमरे

दरम्यान, सत्तेतील वाटेकरी वाढत चालले असल्याचे पाहून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता व तगमग दिसून येत आहे आहे. तर राजकारणाच्या या खालावलेल्या स्तराची जनमानसात चीड व्यक्त होत आहे.

पक्षाच्या आघाड्या, युती होते, तुटते, जुळते. यात मतदारांनी निवडणुकीत दिलेल्या कौलाचे काय? नेत्यांच्या उड्या मारण्याच्या खेळात जनतेला, मतदारांना कोणी गृहीत धरत नाही. स्वार्थ साधला जातो. जनता, जनतेची कामे वर्षानुवर्षे तशीच राहत असल्याचा आक्षेप नागरिकांनी आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी अनेकदा सत्तेत असताना पैठण मतदार संघात एकदा ही महत्त्वाची पदे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळालेली नाही तर सत्ता असताना या भागात कवडीची कामे झाली नाही.

Sharad pawar vs Ajit pawar
Paithan : प्रशासनाचा भोंगळ कारभार ; पैठण पंचायत समितीत तब्बल मागील १३ वर्षांपासून एकही आमसभा झाली

वेळोवेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा केवळ वापर करून घेण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यात व जनतेत नाराजी आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलेच नियोजन केले होते. मात्र, नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे यावर सगळेच पाणी फेरले गेल्याची चर्चा आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Chhatrapati Sambhaji Nagar : वृद्ध नवऱ्याकडून तिसऱ्या पत्नीचा खून, तीन बायका, नऊ अपत्ये; दोघी बहिणी होत्या सवत

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार इच्छुक पैठणमधून असणार असून यांना शह देण्यासाठी शरद पवार यांच्या गटाकडूनदेखील एक उमेदवार असणार असल्याचे आतापासूनच बोलले जात आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दोन गटात विभागली जाणार असल्याने मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार हे निश्चित आहे.

पालकमंत्री भुमरे यांना फायदा

पैठण तालुक्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे काही तालुक्यातील नेत्यांना अडचणी झाल्या असून, काही नेत्यांना अच्छे दिन आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या फुटीचा फायदा विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com