Sambhaji Nagar: पंचायत समितीत नवा भिडू नवा राज; अद्याप एकाही मस्टरवर सही केली नसल्याचे...

मजुरांवर उपासमारी होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मजुरांची मस्टर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी वैयक्तिक लाभाचे शेतकरी व मजूर करीत आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री येथील पंचायत समितीचा सावळा गोंधळ पुन्हा थांबत नसून नव्याने पदभार घेणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याने रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांच्या मस्टरवर सह्या केल्या नसल्यामुळे सुमारे दीड हजार मजुरांची मस्टर झिरो झाले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन मजुराची हजेरी घेऊनही मस्टर झिरो होत असल्याने मजुरासह वैयक्तिक लाभाच्या योजनांतील शेतकरी अडचणीत सापडले आहे.

महिन्याभरापूर्वी गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे संजय गोस्वामी यांनी अद्याप एकाही मस्टरवर सही केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उन्हात राबणाऱ्या मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला कसा देणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मजुरांवर उपासमारी होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मजुरांची मस्टर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी वैयक्तिक लाभाचे शेतकरी व मजूर करीत आहे.

तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, वैयक्तिक घरकुल, सार्वजनिक विहिरी, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते आदी विविध कामे सुरू आहे. परंतु फुलंब्री पंचायत समिती मागील गेल्या काही वर्षापासून सातत्याने वादाच्या भवऱ्यार अडकली आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Local Crime: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठकल्या बेड्या

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू असून सुमारे दीड हजार मजूर वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक योजनेचे काम करीत आहे. परंतु फुलंब्री येथील पंचायत समितीचा नव्याने पदभार स्वीकारणारे गटविकास अधिकारी गोस्वामी यांनी रोजगार हमी योजनेमार्फत सुरू असलेल्या हजेरी मस्टरवर सह्या केल्या नसल्यामुळे सदरील मस्टर हे झिरो करण्यात आले आहे.

आठ दिवसापांसून रजेवर

फुलंब्री येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून महिन्याभरापूर्वी संजय गोस्वामी यांनी पदभार स्वीकारला आहे. परंतु गट विकास अधिकारी हे रजेवर गेले असल्याची दबक्या आवाजात चर्चा पंचायत समितीत सुरू आहे. मागील गेल्या आठ दिवसापासून गटविकास अधिकारी रजेवर असल्याने पंचायत समितीमध्ये आलेल्या लाभार्थ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Local Train : लोकल, प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटर,उद्घोषणा कोमात; प्रवाशांचा गोंधळ !

संगणक परिचालकांची संख्या वाढवा

फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात आलेले. तसेच मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या ही वाढलेली आहे. त्यामुळे या रोजगार हमी विभागात संगणक परिचालकांची संख्या वाढवावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहे.

मस्टरवर सह्या करण्याचा चार्ज द्यावा

-फुलंब्री येथील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रोजगार हमी योजनेत सुमारे दीड हजार मजूर दररोज काम करीत आहे. परंतु मागील गेल्या महिनाभरापासून मस्टरवर गटविकास अधिकारी आणि सही केली नसल्याने मस्टर झिरो झाले आहे. त्यामुळे या मजुरांच्या मस्टरवर सह्या करण्याचा चार्ज इतर अधिकाऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी लाभार्थ्यासह मंजूर करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com