

Chhatraati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध रुग्णालयांतून रोज चारशेहून अधिक रक्तपिशव्यांची मागणी असते. पण, पुरवठा केवळ २५० च्या आसपास होत आहे. १५० पिशव्यांची तफावत निर्माण झाली. सध्या केवळ चार दिवस पुरेल एवढाच साठा रक्तपेढ्यांकडे उरला. परिणामी, अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले असून, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.