Chhatrapati Sambhajinagar : दहशत माजविणाऱ्या टोळीची पुंडलिकनगर परिसरात धिंड

शहर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sambhajinagar city police gang rally Pundliknagar area reduce crime youth
sambhajinagar city police gang rally Pundliknagar area reduce crime youth sakal

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर, गारखेडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चार गुन्हेगारांची हातकड्या घालून पोलिसांनी शनिवारी (ता. २२) गल्लीबोळातून धिंड काढली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

sambhajinagar city police gang rally Pundliknagar area reduce crime youth
Shiv Chhatrapati Sports Awards : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात नाशिकचा ‘षटकार’; राज्य सरकारतर्फे घोषणा

आकाश रतन बनपुरे (वय २७), प्रेम आसाराम सपाटे (३३), सूरज भगवान खंडागळे (३०), अमोल बळीराम वाघमारे (३२, रा. सर्व आनंदनगर, गारखेडा परिसर) आणि शुभम भास्कर त्रिभुवन (२९, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला करणे, शस्त्राचा धाक दाखवणे, जखमी करणे, शांतता भंग करणे, दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोके वर काढले.

sambhajinagar city police gang rally Pundliknagar area reduce crime youth
Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; विभागप्रमुखांच्या अहवालानंतर कारवाई

खुलेआम शस्त्र घेऊन फिरणारे आणि गुंडागर्दी करणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांत दहशत निर्माण होत आहे. म्हणूनच पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांना कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून पुंडलिकनगर गारखेडा परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीतील पाच गुंडांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्हेगार राहत असलेल्या पुंडलिकनगर व गारखेडा परिसरातून त्यांची धिंड काढली.

या प्रकाराने नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अशा कृतीची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com